फुकटचे ॲप शाळा, पालकांची डोकेदुखी; ऑनलाईन वर्गात नको ते मेसेज व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:15+5:302021-08-25T04:35:15+5:30
शाळांनी ही घ्यावी काळजी ऑनलाईन वर्ग सुरू असताना किंवा अभ्यास मागवून घेत असताना मुलांनी कोणत्या ॲपचा वापर करावा, विनाकारण ...

फुकटचे ॲप शाळा, पालकांची डोकेदुखी; ऑनलाईन वर्गात नको ते मेसेज व्हायरल!
शाळांनी ही घ्यावी काळजी
ऑनलाईन वर्ग सुरू असताना किंवा अभ्यास मागवून घेत असताना मुलांनी कोणत्या ॲपचा वापर करावा, विनाकारण कोणतेही ॲप वापरू नये याची माहिती द्यावी. ग्रुप असतील तर त्याला केवळ ॲडमिनने संदेश टाकण्याची सेटिंग करण्याची गरज आहे.
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल अधिक काळ राहत आहे. त्यामुळे मोबाईल हाताळताना मुलं कोणते ॲप वापरतात याकडे पालकांनी लक्ष देणे आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
असेही घडू शकते
मुलांना मोबाईलमधील फुकट ॲपमध्ये विविध व्हिडिओ, छायाचित्रे दिसतात. मुले ते कुतुहलाने पाहतात. काही वेळा मुले हा मेसेज आपल्या मित्र- मैत्रिणींना फाॅरव्हर्ड करू पाहतात. परंतु, तो इतर कोणाच्या तरी मोबाईलवर गेल्याने गैरसमज होऊ शकतात.
दक्षता महत्त्वाची
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात अधिक काळ मोबाईल राहत आहे. त्यामुळे मोबाईलवरील ॲप वापरताना मुलांनी कोणती काळजी घ्यावी, याची त्यांना वेळोवेळी माहिती द्यावी.
- पोनि. मारुती खेडकर