शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 17:51 IST

Kidnapping at Jalana सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसातारा येथील तरुणांची नोकरीचे आमिष देऊन केली होती फसवणूक जालना येथील बसस्थानकातून केले तरुणाचे अपहरण

जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना लाखो रूपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेवून गेलेल्या नऊ जणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक  केली.  वैभव भैरू पाटील (वय २१. रा. तिरपण्या जि. कोल्हापूर), सतीश गराडे (वय २३ रा. आमनेवाडी जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (वय २९ रा. करंजोशी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६ रा. युलुर जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे  (३५. रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२ रा. अगरण धुळगाव जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.  

विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) हा  १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकर वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊ जणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीत घेऊन गेले. या प्रकरणी तरूणाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगाव मार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली होती. पोनि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.

नोकरीचे आमिष देऊन केली फसवणूक दरम्यान, विठ्ठल जारवाल याने सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी विठ्ठल सातारा येथे गेला असता त्याने आपली मंत्र्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करून तरुणांना नोकरीचे आमिष दिले. बेरोजगार तरुणांनी आमिषाला बळी पडत त्याला रोख रक्कम दिली. बरेच दिवस झाले तरी नोकरीबद्दल काहीच हाती लागत नसल्याने तरुणांनी विठ्ठलकडे पैस्यांची मागणी केली. त्याने चालढकल केल्याने संतप्त तरुणांनी जालन्यात येऊन विठ्ठलचे अपहरण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणJalanaजालना