बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:15 IST2018-02-05T00:14:51+5:302018-02-05T00:15:07+5:30
भोकरदन तालुक्यातील धावडा शिवारात बिबट्याचा हल्ल्यात चार मेंढ्याचा मृत्यू झाला. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील धावडा शिवारात बिबट्याचा हल्ल्यात चार मेंढ्याचा मृत्यू झाला. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धावडा शिवारात बिबट्याचा संचार असून, या पूर्वीही शेळ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्री एकबाल खॉ अकरम खॉ यांनी गावातील एका शेतक-याच्या शेतात रात्री मेंढ्या थांबविल्या होत्या. पैकी चार मेंढ्या बिबट्याने ठार केल्या. मृत मेंढ्यांचा काही भाग खाल्लेला आढळून आला. मेंढ्या मरून पडल्याचे लक्षात आल्यानंतर बिबट्याने त्यांना ओढत नेले असावे, अशी शक्यता पशुपालकांनी व्यक्त केली. वनपाल जाधव व दोडके यांनी पंचनामा केला. मेहगाव, वडाळी या डोंगराळ भागात या पूर्वी बिबट्या आढळून आलेला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी एकबाल खॉ, मुक्तार आदींनी केली आहे.