पट्ट्यातील चार बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:29+5:302021-01-01T04:21:29+5:30
आष्टी : प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने सोडविण्याबाबत आष्टी (ता. परतूर) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे ...

पट्ट्यातील चार बातम्या
आष्टी : प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने सोडविण्याबाबत आष्टी (ता. परतूर) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच दिले. निवेदनावर निलाबाई उबाळे, रामा मोरे, मैनोद्दीन इनामदार, अनिल मोरे, कांताबाई क्षिरसागर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेवगा गावात आरोग्य दिवस साजरा
अंबड : तालुक्यातील शेवगा येथील अंगणवाडी येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवसाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी मुला- मुलींना वाढत्या वयातील शारीरिक बदल यांसह विविध विषयांवर माहिती देण्यात आली. सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणे, याविषयी माया सुतार यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.
दरेगावातील प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी
जालना : शहराजवळ असलेल्या दरेगाव रमणा जंगल परिसरात उभारण्यात येत असलेल्या अटल घन- वन प्रकल्पास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक पी. पी. पवार यांनी प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषद सीईओ निमा अरोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड, के. टी. पचलोरे आदींची उपस्थिती होती.
मोकाट जनावरांचा रस्त्यावर वावर वाढला
जालना : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. जनावरे अनेकदा शहरातील भोकरदन नाका, बसस्थानक परिसर, मामा चौक, महावीर चौक, पाणीवेस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, काद्राबाद, गांधी चमन आदी भागातील रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. वेळीच याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.