अंध विद्यालयातील चार ड्रम चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST2021-08-01T04:27:51+5:302021-08-01T04:27:51+5:30

दोन हजारांची देशी दारू जप्त जालना : तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाघ्रूळ शिवारातील सह्याद्री हॉटेलमध्ये बेकायदेशीर विक्री केली ...

Four drums were stolen from a blind school | अंध विद्यालयातील चार ड्रम चोरले

अंध विद्यालयातील चार ड्रम चोरले

दोन हजारांची देशी दारू जप्त

जालना : तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाघ्रूळ शिवारातील सह्याद्री हॉटेलमध्ये बेकायदेशीर विक्री केली जाणारी १९०० रुपयांची देशी दारू पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. शुक्रवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी संशयित दादासाहेब देविदास पाखरे याच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल आढे अधिक तपास करत आहेत.

वीरेगाव येथून दुचाकी लंपास

जालना : तालुक्यातील वीरेगाव येथील अमर शिवाजी जाधव यांनी घरासमोर उभी असलेली चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी जाधव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोडबोले हे करीत आहेत.

============

Web Title: Four drums were stolen from a blind school