डीव्हीआर सापडला, पण फुटेज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:40 IST2018-03-04T01:40:25+5:302018-03-04T01:40:28+5:30
तहसील कार्यालयात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजचा गायब डीव्हीआर पोलिसांना सापडला आहे. मात्र, त्यातील फुटेज गायब असून, ते कुणीतरी गायब केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

डीव्हीआर सापडला, पण फुटेज गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील तहसील कार्यालयात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजचा गायब डीव्हीआर पोलिसांना सापडला आहे. मात्र, त्यातील फुटेज गायब असून, ते कुणीतरी गायब केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
भोकरदन तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांत सिनेर्स्टाइल हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे. कार्यालयातील मारहाणीचा प्रकार ज्या सीसीटीव्ही कमे-यात कैद झाला. त्या कॅमे-याचा डीव्हीआर बॉक्स गायब करण्यात आला होता. तपास कामासाठी डीव्हीआर बॉक्स उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तहसीलदार योगिता कोल्हे यांना पत्र दिले होते. कोल्हे यांनी शनिवारी सदरचा डीव्हीआर बॉक्स तपास अधिकारी उपनिरीक्षक वैशाली पवार यांच्याकडे दिला. पोलिसांनी संगणक व सीसीटीव्हीची माहिती असणा-या एका खाजगी डीव्हीआरची तपासणी केली. मात्र, त्यामधील फुटेज गायब असल्याचे समोर आले. कुणीतरी हे फुटेज डिलिट केल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासणीसाठी डीव्हीआर मुंबईला पाठविण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक पवार यांनी सांगितले.