निवडणुकीत सूचनांचे पालन करा - खेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:27+5:302021-01-15T04:25:27+5:30

मनसेच्या तालुका उपाध्यक्षपदी पाटेकर जालना : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जालना तालुका उपाध्यक्षपदी दिलीप पाटेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ...

Follow the instructions in the election - Khedkar | निवडणुकीत सूचनांचे पालन करा - खेडकर

निवडणुकीत सूचनांचे पालन करा - खेडकर

मनसेच्या तालुका उपाध्यक्षपदी पाटेकर

जालना : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जालना तालुका उपाध्यक्षपदी दिलीप पाटेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पाटेकर यांनी गत दहा वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे तालुक्यासह ग्रामीण भागात स्वागत केले जात आहे.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

जालना : शहरासह परिसरात मोेकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत आहेत. विशेषत: लहान बालकांना या कुत्र्यांचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक विजय पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

माजी सरपंच, उमेदवारांची बैठक

जालना : चंदनझिरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील माजी सरपंच, उमेदवारांची चंदनझिरा पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला. निवडणुकीसाठी नियुक्त बंदोबस्ताची माहितीही कौठाळ यांनी दिली.

Web Title: Follow the instructions in the election - Khedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.