लोककलावंत जाताहेत मजुरीने; सरकारी मदत केवळ नावालाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:26+5:302021-08-17T04:35:26+5:30
जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील लोककलावंतांची मोठी फरपट सुरू आहे. अनेक जण शेतशिवारात इतरांच्या शेतात मजुरीने जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत ...

लोककलावंत जाताहेत मजुरीने; सरकारी मदत केवळ नावालाच !
जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील लोककलावंतांची मोठी फरपट सुरू आहे. अनेक जण शेतशिवारात इतरांच्या शेतात मजुरीने जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
शासनाने लोककलावंतांना मदत जाहीर केली. त्या रकमेतूनच जनजागृतीची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे शासकीय मदतीतून त्यांच्या हातात किती रक्कम पडणार, असाही प्रश्न आहे. राज्य शासनाने लोककलावंतांना अधिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
राज्य शासनाने लोककलावंतांना मदत जाहीर केली आहे.
या शासकीय मदतीतून लोककलावंतांना जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत.
याद्या तयार करण्याचे आदेश असून, ही रक्कम हाती केव्हा पडणार हे सांगता येत नसल्याचे प्रशासन सांगते.
मदत हातात
किती उरणार ?
लोककलावंतांना एखादा लहानसा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तरी पाच हजारांवर खर्च येतो.
लोककलावंतांना इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यात वाढ होते.
५ हजारांत १० कार्यक्रम घ्यायचे म्हटलं तर हातात किती रक्कम शिल्लक राहणार, हा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील कलावंत त्रस्त
जिल्ह्यातील लोककलावंतांसाठी असलेली समिती दोन वर्षांपासून गठित झालेली नाही.
अनेक लोककलावंत शासकीय योजनांसाठी संबंधित कार्यालयात खेटे मारतात.
समितीच गठित नसल्याने हे लोककलावंत शासकीय योजनांपासून वंचित आहेत.
कलावंतांची फरपट
आम्ही पारंपरिक भजन ही लोककला जपत आलो आहोत; परंतु कोरोनामुळे कार्यक्रम बंद पडल्याने आम्हाला मजुरीने कामाला जावे लागत आहे. शासनाने लोककलावंतांना अधिक मदत करावी.
- संतोष दांडगे
वाघे-मुरळी या लोककलेतून आम्ही जनजागृतीचे काम करतो; परंतु कोरोनाचा आमच्या लोककलेवर परिणाम झाला. त्यामुळे लोककलावंतांची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे.
- छगन लोखंडे
पोतराज, पोवाडे, गवळणी आदी लोककलेच्या माध्यमातून मी जनजागृतीचे काम करतो. कोरोनामुळे आमचे नुकसान झाले आहे. शासनाने आम्हाला अधिकची मदत द्यावी.
- सुभाष सुरडकर