फुले जयंती बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:58+5:302021-01-04T04:25:58+5:30
धामणगाव येथे कार्यक्रम राजूर : धामणगाव येथे सरपंच मोनिका साळवे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ...

फुले जयंती बातम्या
धामणगाव येथे कार्यक्रम
राजूर : धामणगाव येथे सरपंच मोनिका साळवे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अनिल साळवे, उपसरपंच काकासाहेब खैरे, मुरलीधर राठोड, जनाबाई पवार, अनिता काफरे, आशा पवार, बद्रीनाथ चव्हाण, गुलाब चव्हाण आदींची उपस्थिती होती.
----------
फोटो आहे
कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
वालसावंगी : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गोपाल लाठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमास गोपाल लेनेकर, जगन्नाथ आढाव, योगेश कानडजे, गणेश गवळी, किरण गवळी, किशोर तबडे यांची उपस्थिती होती. अविनाश गवळी यांनी सूत्रसंचालन केले. मनोज पवार यांनी आभार मानले.
----------
माळी समाजाच्या वतीने कार्यक्रम
वालसावंगी : येथील माळी समाजबांधवांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मण मळेकर, हिरालाल कोथलकर, विनोद वाघ, लक्ष्मण वाघ, अजिंक्य वाघ, लक्ष्मण सपकाळ, शामराव वाघ, रामदास मोकासरे, हिरालाल वाघ, फकिरा आहेर, सुरेश आहेर, रेवन सुरडकर, दामू वाघ, श्रीराम फुसे यांची उपस्थिती होती.