फुले जयंती बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:56+5:302021-01-04T04:25:56+5:30
ओबीसी महिला मोर्चा, जालना जालना : ओबीसी महिला मोर्चाच्या वतीने भगवान सेवा मंगल कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी ...

फुले जयंती बातम्या
ओबीसी महिला मोर्चा, जालना
जालना : ओबीसी महिला मोर्चाच्या वतीने भगवान सेवा मंगल कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी महिलांनी व बालिकांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. दरम्यान ‘सावित्रीबाई फुले यांचा विजय असो’ ‘जय ज्योती जय सावित्री’ अशा घोषणा देण्यात आल्या.
-------------
फोटो आहे
सरस्वती भुवन प्रशाला, जालना
मंठा : सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरातील श्री सरस्वती भुवन प्रशालेत महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मारूती पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उषा जाधव यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी सर्व महिला शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. श्रुष्टी तौर व मालिका जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती दिली. पर्यवेक्षक संतोष जोशी, नीता दहिवाल, रत्नाकर लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. उषा जाधव यांनी अभ्यासपूर्ण महिला उद्धारासाठी फुले दांपत्याने केलेला त्याग व समर्पणाची माहिती दिली. यावेळी माजी शिक्षक अ. ल. कुलकर्णी, जयमाला सिंदखेडकर, अनिता बनसोडे, सुलोचना वाघमारे, एस. आर. वाडेकर, के. डी. जोशी, व्ही. जी. माधवले, अनिता बनसोडे, एम. जी. पोलास, जे. एम. गायकवाड, विजया कुलकर्णी, मनीषा चव्हाण, वंदना जाधव, बिना पाठक, अंजली वणीकर, नीता दहीवाळ, चेतना भाले, सुलोचना वाघमारे, संगीता वाघमारे, सीमा पाटोळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.