समर्थांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:56 IST2019-12-09T00:55:33+5:302019-12-09T00:56:11+5:30
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत समर्थ महासंगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

समर्थांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत समर्थ महासंगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी दुपारी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी चैतन्य ज्ञानपीठाचे राष्ट्रीय समन्वयक मुकुंदराव गोरे, अध्यक्ष डॉ. जगदीश करमळकर, राजकुमार वायदळ, अरविंद दहिवाळ, गणेश हिंगमीरे, चैतन्य ज्ञानपीठाच्या सदस्यांसह स्वयंसेवकांची उपस्थिती होती. महासंगमाचे कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील कणेरीमठाचे प. पू. काडसिद्धेश्वर महाराज यांची उपस्थिती होती. या महासंगमात शौर्य प्रात्यक्षिके, परिसंवाद, संत पूजन, भारुड, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, मध्यप्रदेश, दुबई, आॅस्ट्रेलिया व महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने भाविक एकत्र आल्याचे सांगण्यात आले.