प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:13+5:302021-02-05T08:01:13+5:30
जालना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन, ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण
जालना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन, गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शिवाय काही ठिकाणी विविध उपक्रमही राबविण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा, दानापूर
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापक ए.ए. भारती, आर.वाय. कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख पी.बी. सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, जफर शेख, जहीर शेख, मोबीन शेख, युसुफ शेख, अझर शेख, अंबादास कनगरे, रामेश्वर दळवी, रावसाहेब पवार, अजीम शेख आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कार्यालय, दानापूर
दानापूर : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक एस.आर. पडोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी योगेश वैध, रमेश कनगरे, नारायण मोकासे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, जफर शेख, जहीर शेख, मोबिन शेख, यसुफ शेख, अझर शेख, अंबादास कनगरे, रामेश्वर दळवी, जुनेद शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दानापूर येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण
दानापूर : येथील केसरबाई महाविद्यालयात मुख्याध्यापक रामदास गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती. तसेच दीपभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक बी. के. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो
व्हिजन इंग्लिश स्कूल, चंदनझिरा
चंदनझिरा : येथील व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. शबीस्ता पटेल व नगरसेविका स्वाती जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा लता सावंत, मुख्याध्यापिका नीता शिंदे, रमेश तुपे, जयश्री सहारे, स्नेहल बळक, ज्योती मिसाळ, वर्षा फोके आदींची उपस्थिती होती.
----------
एस.के.इंग्लिश स्कूल, चंदनझिरा
चंदनझिरा : येथील एस.के. इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये विनोद कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश चव्हाण, रमेश तुपे, प्राचार्य हर्षवर्धन तनपुरे, राहुल दसपुते, योगेश सहाने, प्रभाकर सहाने, रवी दखने आदी उपस्थित होते.
--------------------------
फोटो
टेंभुर्णीसह परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात
टेंभुर्णी : टेंभुर्णीसह परिसरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांसह शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक नारायण खिल्लारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये एपीआय ज्ञानेश्वर पायघन यांच्या हस्ते तर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश साबळे यांनी ध्वजारोहण केले. जेबीके विद्यालयात अध्यक्ष संजय काबरा यांनी तर मारोतराव पाटील विद्यालयात संस्थाध्यक्ष दिनकर देशमुख यांनी ध्वजारोहण केले. जिजाऊ इंग्लिश शाळा व महाविद्यालयात संस्था अध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयेशा उर्दू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक हबीब ऐद्रुस चाऊस यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आर. डी. लहाने यांनी ध्वजारोहण केले. ईबीके विद्यालयात संस्था अध्यक्ष देवराव देशमुख यांनी ध्वजारोहण केले. नळविहरा येथील जिल्हा परिषद शाळेत देशसेवा बजावत असलेले सैनिक अमोल गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेत दमोता फलके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो
नळविहरा येथील जिल्हा परिषद शाळेत सैनिक अमोल गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी.आर. मुनेमानिक आदींची उपस्थिती होती.
------------
फोटो
रेणुकादेवी विद्यालय, पिंपळगाव रेणुकाई
पिंपळगाव रेणुकाई : येथील रेणुकादेवी मा. व उच्च माध्यमिक विद्यालय व कै. आण्णासाहेब देशमुख महाविद्यालयात संस्थेचे सचिव भास्कर देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. एन. यू. लेखनार, संस्थेचे अध्यक्ष वसंत देशमुख, कोषाध्यक्ष बबन गाढे, प्राचार्य जी.एच. राव, रामराव रींढे, केंद्रप्रमुख लोखंडे, ए.व्ही. देशमुख, जी.पी. पांडे, प्राचार्य व्ही.आर. देशमुख, प्रा. ए.जी. सदाशिवे, प्रा. एस.टी. लोखंडे, कार्यालयीन अधीक्षक डी.ए. देशमुख, पी.के. बोर्डे, प्रा. डी.एस. भूते, आर.डी. खराटे, व्ही.बी. देशमुख, व्ही. जी. देशमुख, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.
---------------------
फोटो ओळी
बदनापूर : येथील जि.प. प्रशालेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक आर.के. शेख, शिक्षक सपकाळ, पठाडे, चव्हाण आदी उपस्थित होते.
----------------
फोटो
देवकी महाविद्यालय, पीरपिंपळगाव
जालना : पीरपिंपळगाव येथील देवकी महाविद्यालयात बद्रीनाथ बोरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विकास बोरुडे, बद्रीनाथ मोहिते, अमोल पाटील, शरद बोरुडे, अविनाश पालवे, परमेश्वर मोहिते, ऋषी निकम आदी उपस्थित होते.
--------------------
रूख्मीनी केंद्रीय निवासी आश्रमशाळा, रामनगर
जालना : रामनगर येथील रूख्मीनी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संस्थेचे अध्यक्ष ब्रम्हानंद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी. बी. कोल्हे, व्ही. व्ही. भुजंग, शिंदे, डी.बी. आढाव, सी. एस. अंभोरे, एस. आर. श्रीसंदर आदींची उपस्थिती होती.
---------------
फोटो
प्रियदर्शनी विद्यालय, भोकरदन
भोकरदन - शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संतोष दसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यपिका अंजना गोरे, भगवान पालकर, संजय सिंह खंडाळकर, दामोदर वसावे, भगवान गावंडे, जनार्दन इंगळे, रमेश शिंदे, राजू सोनवणे, संजय दसपुते, मिलिंद तायडे, मानिक पाडळे, कन्हैयालाल चोरमारे आदींची उपस्थिती होती.
--------------
फोटो- महत्वाची फोटो घेणे
डायमंड ज्युुबली इंग्लिश स्कूल, जालना
जालना - येथील डायमंड ज्युबली इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या सचिव पुष्पा तनपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य हर्षवर्धन तनपुरे, कुलकर्णी, नागरे, ऋषी तारख आदींची उपस्थिती होती.