अंबड येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:44+5:302021-02-05T08:00:44+5:30

अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयात अंबड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष दिनेश वाघ यांच्या हस्ते ...

Flag hoisting at various places at Ambad | अंबड येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण

अंबड येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण

अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयात अंबड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष दिनेश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच भुजंग वाघ, नारायण सावंत, सोनाजी गाढे, सीताराम बोडखे, मुख्याध्यापक एल.आर. जाधव, शिक्षक एन.टी. राजपूत, पी.व्ही. बुलबुले, डी.बी. कुरील, ए.एम. डोरले, बी.एन. सरोदे, एन.यू. शेख, बी.टी. कोळी, ए.बी. गायकवाड, बी.आर. वाघुंडे, पी.एस. बोडखे उपस्थित होते. तर दहीपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयात संस्थेचे सचिव अमोल खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तलाठी मगरे, साहेबराव मोरे, एस. यू. मोरे, प्रेमदास राठोड, गौतम लिहिणार, अतिश निर्मळ, कैलास गायके, जालिंदर रांजणे यांच्यासह पालक बळीराम तोगे, जितेंद्र सपकाळ, रावसाहेब टापरे, अंबादास जोशी, विपुल निर्मळ, गुलाब शेख, उत्तम येडे, अनंता जायभाये, परमेश्वर उगले, दिनेश ठाकुर, कृष्णा गायके, सचिन अंबडकर, बालासाहेब ढेंबरे आदींची उपस्थिती होती.

फोटो

हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयात दिनेश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

००००००००००००००००००

फोटो सहित घेणे

वृक्षारोपण करून प्रजासत्ताक दिन साजरा

देऊळगाव राजा : येथील डॉ.काबरा सहकार विद्या मंदिर शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी विविध ७२ जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बुलडाणा अर्बनचे सीएमडी डॉ.सुकेश झंवर, वनक्षेत्रपाल एस.एस. दुबे, सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. गव्हाणे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, भाजपा नेते डॉ.गणेश मांटे, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी जगन्नाथ डोईफोडे, धरती बचाओचे सीएमडी वनश्री जनाबापू मेहेत्रे, ज्ञानेश्वर देशमाने, संजय कुलकर्णी, कृष्णा सवडे, प्राचार्य सजिता सुरडकर, प्राचार्य शेरे, डॉ.काबरा, डॉ. दायमा, संजू डोणगावकर, डॉ.अमित काबरा, हभप. वाघ महाराज, डॉ.गणेश मांटे, रमेश कायंदे, जगन्नाथ डोईफोडे, वाघ महाराज आदींची उपस्थिती होती.

Web Title: Flag hoisting at various places at Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.