अंबड : गुटक्याची वाहतूक करणारी स्वीप्ट कार शहरातील मार्डी फाटा येथे मिळून आल्याने पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून उभी केली आहे. त्यात गुटखा सापडल्याने याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला कळविली आहे. शनिवारी पहाटे अंबड पोलीसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी वाहनांची तपासणी करताना या कारमध्ये गुटख्याचा साठा आढळून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांनी दिली. अनिरुध्द नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शहाजी पाचारणे, पोलीस नाईक अनिल घेवंदे,संतोष वनवे, दुर्गेश गोफने, हर्षवर्धन मोरे, यादव आदींनी ही नाकाबंदी केली होती. हा गुटखा कोठून आणला होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
कारमधून पाच लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:36 IST