गारगोटीची वाहतूक करणारे पाच जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:12+5:302021-02-05T08:00:12+5:30
२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; तालुका जालना पोलिसांची कारवाई जालना : अवैधरीत्या गौण खनिज गारगोटीची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना ...

गारगोटीची वाहतूक करणारे पाच जण अटकेत
२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; तालुका जालना पोलिसांची कारवाई
जालना : अवैधरीत्या गौण खनिज गारगोटीची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना तालुका जालना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टेम्पोसह २ लाख ७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नंदापूर शिवारातील समृद्धी रस्त्यावर मौल्यवान गौण खनिज गारगोटीची वाहतूक पाच जण करीत असल्याची माहिती पो.नि. यशवंत बागुल यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपी अजय हरिचंद्र मगर (२५), भगवान काळुजी दाभाडे (५४, दोघे रा. पिरपिंपळगाव, ता. जालना), शरद दादाराव जाधव (२२), जालिंदर श्यामराव जाधव (२७, दोघे रा. बामखेड, ता. देऊळगाव राजा), शिवराम प्रेमदास जाधव (२५, रा. बावणे पांगरी, ता. बदनापूर) यांना टेम्पोसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. यशवंत बागुल, पो.उप.नि. बगाड, संदीप उगले, वसंत धस. कृष्णा भडांगे, सिंंघल, नागरे यांनी केली आहे.