शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना चिंता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:44 IST

जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.गतवर्षी २०१७-१८ मध्ये भरलेला रबीचा व चालु वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामाचा पिकविमा शेतक-यांना अद्यापही मिळाला नाही. परिणामी, शेतक-यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच खरीप २०१८ साठी शासनाने जाहीर केलेली अर्थिक मदत एकाच टप्प्यात देण्याऐवजी ती दोन टप्प्यात विभागून देण्यात येत आहे. बहुतांश गावातील शेतक-यांना अर्धा मे महिना उलटला, तरीही अर्थिक मदत मिळाली नाही. पहिलाच टप्पा न मिळाल्याने दुसरा टप्पा कधी मिळणार ? अशा सवालही शेतकरी करत आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र कमी असल्याने बहुतांश वर्ग कोरडवाहु शेतीवरच अवलंबून आहे. परिणामी, तालुक्यातील फळबाग क्षेत्र कमालीचे घटले आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही शेतक-यांना मिळाली नाही.खरीप व रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पिकांचे झालेले नुकसान विम्या पोटी भरुन मिळेल या आशेने शेतक-यांनी पिक विमा भरला. पिक विमा दुष्काळात शेतक-यांना सावरेल अशी अपेक्षा शेतक-यांना होती. परंतु, ही अपेक्षाही भंग झाली आहे. अशा परिस्थितीत येणा-या हंगामात खते व बियाणांची खरेदी कशी करायची ? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.शेतक-यांना शंका : बोगस बियाणांचे काय ?बोगस बियाणे आणि खतांचा उलगडा महसूल तसेच कृषी विभागाने केला. याचा मनस्वी आनंद शेतक-यांना झाला. असे असले तरी पुढच्या हंगामास सामोरे जातांना बियाणे आणि खते ही चांगली मिळतील का ? अशी शंका त्यांच्या मनात घर करुन आहेत. यासाठी बियाणे व खतांबद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdroughtदुष्काळCrop Loanपीक कर्ज