चोरट्यांनी पळविली मच्छीमाराची बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST2021-02-22T04:20:22+5:302021-02-22T04:20:22+5:30
परतूर (जि. जालना) : एका मच्छीमाराची ४० हजारांची बोट (नाव) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री जुने मापेगाव ...

चोरट्यांनी पळविली मच्छीमाराची बोट
परतूर (जि. जालना) : एका मच्छीमाराची ४० हजारांची बोट (नाव) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री जुने मापेगाव (ता. परतूर) येथे घडली असून, या प्रकरणी परतूर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प गतवर्षी शंभर टक्के भरला होता. त्यामुळे मच्छीमारीला चांगले दिवस आले. मच्छीमारांनी या प्रकल्पात असंख्य मच्छीबीज टाकले. व्यवसाय सुरू झाल्यानंतर मात्र, मासे चोरी करणाऱ्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यातच मच्छीमारांचे साहित्यही चोरून नेले जात होते, परंतु चोरट्यांनी मापेगाव येथील एक ४० हजार रुपयांची बोट चोरून नेली आहे. या घटनेने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या प्रकरणात मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती लिंबुरे यांनी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चौकट
निम्न दुधना प्रकल्पावरील मासेमारीचा रीतसर ठेका आम्ही घेतला आहे. त्यासाठी मोठा खर्च करण्यात आला, परंतु काही ठरावीक चोरट्यांमुळे मच्छीमारांची झोप उडाली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती लिंबुरे यांनी व्यक्त केली आहे.
कॅप्शन : चोरट्यांनी चोरून नेलेली जुने मापेगाव येथील बोट.
===Photopath===
210221\21jan_47_21022021_15.jpg
===Caption===
कॅप्शन : चोरट्यांनी चोरून नेलेली जुने मापेगाव येथील बोट.