शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंविरोधात विलास औताडे पहिल्याच बैठकीत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:25 IST

भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे , असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे. कुठलेही कंत्राट असले की, एक तर चुलत भाऊ अथवा जावई वा अन्य नातेवाईकांनाच दिली आहेत. त्यामुळे विकास करताना त्यांच्या नातेवाईकांचा आर्थिक विकास केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.यावेळी ते म्हणाले की, दानवे यांना हृदयाचा पत्ता नसून, त्यांची भूमिका शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा आपण पर्दाफाश करू, विकास म्हणजे केवळ रस्ते तयार करणे नव्हे, त्यातून गोरगरिबांसह शेतकऱ्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. एकूणच औताडे यांनी त्यांच्या पहिल्याच जालना दौऱ्यात ही आक्रमक भूमिका दानवेंविरोधात घेतल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले होते. सतकर कॉम्प्लेक्स येथे ही बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, डॉ. संजय लाखे पाटील, शहराध्यक्ष शेख महेमूद, कल्याण दळे, सुदामराव सदाशिवे, अ‍ॅड.विनायक चिटणीस, विजय कामड, बदर चाऊस, राजेंद्र राख, जीवन सले, महावीर ढक्का, विजय चौधरी, दिनकर घेवंदे, तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले.आरोपात तथ्य नाहीआपण जालना लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे एवढा निधी खेचून आणून रस्ते, पूल तसेच अन्य विकास कामांवर तो खर्च केला. या विकास कामांच्या गतीने विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळे ते माझ्यासह माझ्या कुटुंबियांवर बेछूट आरोप करत आहेत. या आरोपात कुठलेच तथ्य नाही.- खा. रावसाहेब दानवे,जालना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस