शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:49 IST

जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गा$चा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. सोमवारी लोकमतच्या टीमने जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाची पाहणी केली. या पाहणीत महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य अधिकारी सोडले तर सर्वच जण अनुपस्थित दिसले. या प्रकरामुळे सोमवारी ग्रामीण भागातून आलेल्या सर्वच नागरिकांची कामे खोळंबली होती.जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजले जाते. येथूनच सर्व जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामांसाठी दररोज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येतात. नागरिकांच्या कामांसाठी अधिकाºयांना सोमवार व शुक्रवार हा दिवस दिला आहे. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारीच नसल्याने नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकमतने जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची पाहणी केली. सुरवातीलाच मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचे दालन बंद दिसले. त्यानंतर सर्व विभागांची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांचेही कार्यालय बंदच दिसले. येथील कर्मचा-यांकडे विचारपूस केली असता, ते म्हणाले की, साहेब आलेच नाही. तसेच पशु संवर्धन विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिकचे अधिकारीच दिसले नाही.या प्रत्येक विभागाच्या बाहेर मात्र, ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात हे मात्र कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत होते.वेगवेगळी कारणे सांगून अधिकारी दिवस-दिवस गायब असतात. नागरिक मात्र जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत असून अधिकारी गैरहजर असल्याने त्यांची कामे होत नाहीत.कारभार सुधारण्याची गरजजिल्हा परिषदेच्या समित्यांच्या सभा, सर्वसाधारण सभांना अन्य सरकारी विभागाच्या अधिका-यांना बोलावले जाते. परंतु, या विभागांचे अधिकारी मात्र सभांना जाण्याचे टाळतात. काही वेळेस प्रतिनिधी पाठवतात. त्यामुळे सभेत कामकाज करणे अवघड होते. अशा वेळी सदस्य संतापतात. गैरहजर राहणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्यानुसार अधिका-यांच्या तक्रारीही झाल्या आहेत. आता मात्र जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सुधारण्याची गरज ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांनी बोलून दाखवली.सोमवारी काही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यानंतर सोमवारी आणि शुक्रवारी अधिकारी कार्यालयात हजर नसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.- अनिरुध्द खोतकर, जि.प. अध्यक्ष

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी