नायगावमध्ये किराणा दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST2021-02-22T04:20:09+5:302021-02-22T04:20:09+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...

नायगावमध्ये किराणा दुकानाला आग
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम
जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक मोहन राठोड, अनिल खंडाळे, अजय मिरकड, प्रफुल्ल हिवरेकर, संजय छबीलवाड, भगवान शिंदे, प्रसाद काकडे, राहुल तायडे, राजू हिवाळे, भगवान अंभोरे, संकल्प गाडेकर, दीपक गायकवाड, अखिलेश पाटील आदींची उपस्थिती होती.
नाव्हा गावामध्ये शिवजयंती उत्साहात
जालना : तालुक्यातील नाव्हा गावामध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमास राम भुतेकर, गणेश भुतेकर, अशोक भुतेकर, उद्धव भुतेकर, नानाभाऊ सुरासे, संजय कुहिरे, ज्ञानेश्वर म्हस्के, गंगाराम भुतेकर, अशोक भुतेकर आदींची उपस्थिती होती.
दाभाडी ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन
दाभाडी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात हभप दिलीप महाराज टेकाळे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सूरज टेकाळे, भगवान गाढे, भाऊसाहेब टेकाळे, जुल्फेकार बागवान, योगेश जैवाळ, कैलास बकाल, केदारनाथ टेकाळे, नागोराव बकाल, संदीप रगडे, सुभाष गोलेच्छा आदींची उपस्थिती होती.
तुपेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम
बदनापूर : तालुक्यातील तुपेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाभिक सेवा संघाचे तालुका संपर्क प्रमुख रामेश्वर अपार, गणेश निलक, शंकर जाधव, ऋषीनाथ फरताडे, गणेश जाधव, सूरज काफरे, अर्जुन जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.