अखेर तहसील कार्यालयाकडून वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:57+5:302021-02-26T04:43:57+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील पूर्णा नदीपात्रातील वाळूघाटातून नियमबाह्य वाळूचे उत्खनन सुरू होते. याबाबत लोकमतने ...

अखेर तहसील कार्यालयाकडून वाहनांची तपासणी
तळणी : मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील पूर्णा नदीपात्रातील वाळूघाटातून नियमबाह्य वाळूचे उत्खनन सुरू होते. याबाबत लोकमतने २१ फेब्रुवारीच्या अंकात नियमबाह्य वाळू उत्खननाकडे महसूल विभागाची डोळेझाक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर तहसील प्रशासनाला जाग आली असून, गुरूवारी तहसीलदारांनी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
वझर सरकटे या वाळूघाटाच्या लिलावानंतर संबंधित गुत्तेदाराला वाळू उत्खननासाठी महसूलने १२ जानेवारी रोजी ताबा दिला होता. यात गट क्रं. २०७, २१० व २१४ मधून ४०० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी व १ मीटर खोली इतक्या क्षेत्रातून ३ हजार ५३३ ब्रास वाळू उत्खननाची परवानगी दिलेली आहे. मात्र, सिंदखेडराजा तालुक्यातील झोंटिगा येथील गुत्तेदाराकडून शासनाने ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेरून व क्षमतेपेक्षा जास्त वाळू उत्खनन केले जात होते. वाळूघाटावर एक ब्रास राॅयल्टीवर दोन ब्रास, दोन ब्रास राॅयल्टीवर चार ब्रास, चार ब्रास राॅयल्टीवर सहा ब्रास वाळूची वाहतूक केली जात होती. विनातारीख राॅयल्टी पावत्या देऊन महिनाभर त्याच राॅयल्टीवर वाळू वाहतूक सुरू होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन तहसील प्रशासनाने वाहनांची तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी अचानक तहसीलदार सुमन मोरे यांनी उस्वद - मंठा, तळणी- लोणार व मंठा -लोणार रोडवरील तब्बल १५ वाळू वाहतुकीच्या वाहनांची तपासणी केली आहे.
विना रॉयल्टी वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर गुरूवारी सकाळी १५ वाहनांची तपासणी केली. यातील सर्व वाहनधारकांकडे रॉयल्टी आढळून आल्या.
सुमन मोरे, तहसीलदार, मंठा
===Photopath===
250221\25jan_15_25022021_15.jpg~250221\25jan_16_25022021_15.jpg
===Caption===
वाहनांची तपासणी करताना तहसीलदार दिसत आहे. ~झापलेले वृत्त