अखेर ‘त्या’ नालीचे बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:44+5:302021-09-02T05:04:44+5:30

देऊळगाव राजा : शहरातील पोस्ट ऑफिस ते भारतीय स्टेट बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुतेकर, माई हॉस्पिटल, एल. एम. शिंगणे ते ...

Finally, the construction of 'that' drain started | अखेर ‘त्या’ नालीचे बांधकाम सुरू

अखेर ‘त्या’ नालीचे बांधकाम सुरू

देऊळगाव राजा : शहरातील पोस्ट ऑफिस ते भारतीय स्टेट बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुतेकर, माई हॉस्पिटल, एल. एम. शिंगणे ते नालापावेतो या नालीचे बांधकाम रखडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ने २९ ऑगस्ट रोजी ‘सांडपाणी साचते रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर त्या नालीचे काम सुरू झाले आहे.

देऊळगाव राजा येथील त्या नालीचे बांधकाम नगरसेविका रेखा दीपक बोरकर यांनी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावित केले होते. ८ ऑगस्ट २०१९ रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होऊन १३ ऑक्टोबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. परंतु काही नागरिकांच्या घरासमोरून नाली जात असल्यामुळे सांडपाण्याचा व दुर्गंधीचा त्रास होईल म्हणून त्यांनी प्रचंड विरोध केला व काम बंद पाडले. यामध्ये राष्ट्रवादीच्या काही जणांचा पाठपुरावा असल्याची चर्चा होती. परिणामी संपूर्ण दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर तसेच श्रीकृष्ण मंदिर परिसरात येऊन नागरिकांच्या रहदारीचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. भागातील नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. मुख्याधिकारी घारगे यांनी पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बोरकर यांनी या भागातील संबंधितांची भेट घेऊन कामासाठी त्यांचे मन वळविले. संबंधितांनी अनुमती दिल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे.

फोटो

Web Title: Finally, the construction of 'that' drain started