दलित, आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:23+5:302021-02-06T04:55:23+5:30
जालना : दलित, आदिवासींच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानाला घेराव घालून जेलभरो आंदोलन ...

दलित, आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी जेलभरो
जालना : दलित, आदिवासींच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानाला घेराव घालून जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे यांनी दिला.
शिवसेना दलित आघाडीचा बुधवारी जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. यावेळी मगरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना दलित आघाडी दलित आदिवासीच्या ज्वलंत प्रश्नांवर गेले अनेक वर्षांपासून जनआंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. मराठवाडा विशेषत: जालना जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भूमीहिन, कास्तपट्टे नावे करून सात-बारा मिळण्यासाठी शेकडो आंदोलने केली. परंतु, प्रशासन जनआंदोलनाला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे दलित आदिवासींना हक्काचा सात-बारा मिळत नाही. प्रशासन सर्वाेच्च न्यायालय आणि शासन निर्णय १२ जुलै २०११ चा चुकीचा अर्थ लावून दलित आदिवासी भूमीहिन कास्तपट्टे कास्तकरांना हक्काच्या सात-बारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी जय खरात, भाऊसाहेब तांबे, अण्णासाहेब बाळराज, बाळासाहेब गाडेकर, मधुकर पाईकराव, हरेश पठाण, विलास खरात, तुळशीदास पटेकर, विष्णू वाहुळ, मंगलताई गुढेकर, प्रल्हाद साळवे, मुधकर मुळे यांच्यासह भूमीहिनप, कास्तकर, दलित, आदिवासींची उपस्थिती होती.