दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:17+5:302021-02-20T05:28:17+5:30
फोटो बारसवाडा येथे पाच एकर ऊस जळून खाक वडीगोद्री : अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे शार्टसर्किटमुळे तीन शेतकऱ्यांचा पाच एकर ...

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
फोटो
बारसवाडा येथे पाच एकर ऊस जळून खाक
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे शार्टसर्किटमुळे तीन शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बारसवाडा शिवारातील गट नं. ४१ मधील शेतकरी संतोष भालेकर यांचा दोन एकर, राजू मिठे यांचा एक एकर तर गजानन मिठे यांचा दोन एकर ऊस जळाला आहे.
बाबुलतारा येथून ट्रॅक्टर चोरीस; गुन्हा दाखल
जालना : घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथे घडली. या प्रकरणी रावसाहेब भगवान लोहकरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कुंदन पांडुरंग काळे (रा. बाबुलतारा) याच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरपालिकेतील कागदपत्र चोरण्याचा प्रयत्न
जालना : नगरपालिकेतील कर विभागाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कक्षामधील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रसंगी विनायक भुजंग शिर्के यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार सय्यद करीत आहेत.
दुकानासमोरून दुचाकी लंपास
जालना : परतूर येथील दुकानासमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एमएच २१ एएफ ३७३०) लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी विष्णू आत्माराम राऊत यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जालना : मागील भांडणाच्या कारणावरून गांधी चमन येथील शासकीय रुग्णालयात बाचाबाची करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी प्रशांत कमलाकर महाजन यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कपिल विष्णू दाभाडे (३७, रा. पंचशीलनगर, चंदनझिरा), सत्यम सुरेश भट्ट (वय २१), संकेत सुरेश भट्ट (वय १८, दोघे रा. मातोश्रीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सय्यद करीत आहेत.