चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:21+5:302021-04-04T04:31:21+5:30

ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा जालना : निष्काळजीपणाने भरधाव वेगाने ट्रक चालवून ट्रकचे १० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी ...

Filed a case of purchase of stolen goods | चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा

जालना : निष्काळजीपणाने भरधाव वेगाने ट्रक चालवून ट्रकचे १० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी वडीगोद्री येथील पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चव्हाण करीत आहेत.

कडबा पेटविल्याप्रकरणी गुन्हा

जालना : शेतात ठेवलेला कडबा पेटवून दिल्याची घटना शनिवारी दुपारी पुणेगाव येथे घडली. याप्रकरणी राधाबाई सोमवारे यांच्या फिर्यादीवरून संशयित सोपान नामदेव सोमवारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ. देशमुख करीत आहेत.

फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

जालना : प्लॉट खरेदीच्या करारनाम्याचे उल्लंघन करून फसवणूक केल्याची घटना अमीरनगर कुच्चरवटा येथे ७ ऑगस्ट २०२० रोजी घडली. याप्रकरणी कैसर खान अजीज खान यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी सय्यद अब्बास सय्यद हुसेन याच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‌वैधरीत्या दारूची विक्री करणारा अटकेत

जालना : विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी शुक्रवारी ढाकलगाव येथून अटक केली. शालिकराव सराफ (रा. ढाकलगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Web Title: Filed a case of purchase of stolen goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.