सोनक पिंपळगावात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:39+5:302021-01-08T05:42:39+5:30
अंबड : तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे पैशाच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली असून, याप्रकरणी ...

सोनक पिंपळगावात हाणामारी
अंबड : तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे पैशाच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली असून, याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात एका गटातील एकनाथ लक्ष्मण समिंदर यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून परमेश्वर रावसाहेब रायकर, राऊसाहेब विश्वनाथ रायकर, मुंजाभाऊ बाबूराव रायकर, रामेश्वर विश्वनाथ रायकर, सुरेश मुंजाभाऊ रायकर (सर्व रा. सोनक पिंपळगाव) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या गटातील परमेश्वर रावसाहेब रायकर यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पंढरीनाथ लक्ष्मण समिंदर, ज्ञानेश्वर पंढरीनाथ समिंदर, एकनाथ लक्ष्मण समिंदर, गोपाळ एकनाथ समिंदर, गोविंद एकनाथ समिंदर (सर्व रा. सोनक पिंपळगाव) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मेंगडे, हवालदार राऊत करीत आहेत.