खाद्यपदार्थांच्या धंद्यावरून फुकटपु-यात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:40 IST2018-01-02T00:40:37+5:302018-01-02T00:40:42+5:30
तुझ्या चायनीज गाड्यामुळे आमचा धंदा होत नाही, गाडा बंद कर, असे म्हणत नऊ संशयितांनी एकास हॉकी स्टीकसह, तलवार, काठ्याचा वापर करत मारहाण केली. दुकानातील साहित्याचे नुकसान केले.

खाद्यपदार्थांच्या धंद्यावरून फुकटपु-यात राडा
जालना : तुझ्या चायनीज गाड्यामुळे आमचा धंदा होत नाही, गाडा बंद कर, असे म्हणत नऊ संशयितांनी एकास हॉकी स्टीकसह, तलवार, काठ्याचा वापर करत मारहाण केली. दुकानातील साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी सोमवारी नऊ संशयितांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दु:खीनगर भागात राहणाºया शेख इरफान शेख करीमोद्दीन (३२) यांनी फिर्याद दिली आहे. इरफान (पूर्ण नाव समजू शकले नाही), समीर उर्फ डोंगा रहिमोद्दीन, अब्दुल हाफिज अजीज (दोघे रा.रहेमानगंज), हादी (पूर्ण नाव समजू शकले नाही) जाफर अप्पू खान (रा. जाफरखान चाळ), युसूफखान सिकंदरखान (रा. गीतांजली कॉलनी), बख्तायार खान (रा. नॅशनलनगर), सलमान खान बख्तीरखान (रा, नॅशनलनगर), सरफराज खान सिकंदरखान (रा गीतांजली कॉलनी) यांनी हॉकी स्टीक, तलवार, लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच दुकानातील साहित्याची नासधूस केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचे, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक व्ही. एस. मोरे तपास करीत आहेत.