नऊ गावे पंधरा दिवसांपासून अंधारात; विद्यार्थी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:36 IST2018-03-13T00:35:55+5:302018-03-13T00:36:19+5:30
नऊ गावांचा विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद केल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे पाणी, दळण इ. कामे करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

नऊ गावे पंधरा दिवसांपासून अंधारात; विद्यार्थी त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यातील नऊ गावांचा विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद केल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे पाणी, दळण इ. कामे करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
विद्युत वितरण कंपनीचे प्रभारी सहायक अभियंता खंडागळे म्हणाले, या नऊ गावात तालुक्यातील सर्वाधिक वीजबिल थकले आहे. विद्युत बील वसूल न झाल्याने सहायक अभियंता कुरेशी यांना शासनाने निलंबित केले.
आता वसुलीशिवाय पर्याय नाहही. तालुक्यातील वाघोडा, पांगरी वायाळ, वाढेगाव पांढुर्णा, केंधळी, पोखरी, वाढोणा, वझर सरकटे, जयपूर, उमरखेड अर्धेगाव, मुरूमखेडा अशा नऊ गावात सुमारे एक कोटी ५० लाख रुपये विद्युत बील थकले आहे. जयपूर या गावात ४४ लाख रुपये सर्वाधिक थकबाकी आहे. सुमारे ७५० ग्राहकांना यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. नियमित विजेचा भरणार करणा-यांची यामुळे गेरसोय होत आहे. गैरसोय टाळण्याची मागणी आहे.