डावरगावदेवी शाळेत पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:39+5:302021-03-31T04:30:39+5:30
जाफराबाद तालुक्यात सध्या अनेक शाळांतून पक्ष्यांसाठी चारा- पाण्याची व्यवस्था केली जात आहे. तालुक्यातील डावरगावदेवी शाळेने चिऊ ये... दाणा खा... ...

डावरगावदेवी शाळेत पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय
जाफराबाद तालुक्यात सध्या अनेक शाळांतून पक्ष्यांसाठी चारा- पाण्याची व्यवस्था केली जात आहे.
तालुक्यातील डावरगावदेवी शाळेने चिऊ ये... दाणा खा... पाणी पी... भुर्र उडून जा... असा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांंतर्गत शाळेत व गावात ठिकठिकाणी वृक्षांच्या फांद्यावर भांडे तयार करून लटकविण्यात आले आहे. या एकाच भांड्यात पक्ष्यांसाठी दाणा- पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ ग्रामपंचायतचे सरपंच अनिल नवले यांच्या हस्ते झाडावर भांडे अडकवून मंगळवारी करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश अहिरे, ग्रामसेविका धनवई, आदर्श शिक्षक शेख जमीर आदींची उपस्थिती होती. शाळेतील अशा उपक्रमांमुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या मनात नकळत मुक्या जिवांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया यावेळी सरपंच अनिल नवले यांनी दिली.
या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तू नवले, शाळेचे मुख्याध्यापक महेश अहिरे, शिक्षक शेख जमीर, गोविंद जाधव, तुलसीदास जाधव, रत्ना देशमुख, पुष्पा साखरे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत.
फोटो
डावरगावदेवी येथे पक्ष्यांसाठी चारा- पाणी या उपक्रमाचा शुभारंभ करताना सरपंच अनिल नवले आदी.