शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

गरोदर मुलीचा पित्यानेच नातेवाईकाच्या मदतीने घोटला गळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:24 IST

तालुक्यातील धावडा-मेहेगाव रोडवर सोमवारी सकाळी छाया समाधान डुकरे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

भोकरदन (जालना) : तालुक्यातील धावडा-मेहेगाव रोडवर सोमवारी सकाळी छाया समाधान डुकरे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता लग्नाआधी गरोदर राहिल्याने तरुणीचा तिच्या वडिलांनीच नातेवाईकांच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या वडिलासह चार जणांना अटक केली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, सोमवारी सकाळी (दि.26) तालुक्यातील धावडा-मेहेगाव रोडवर एका २० वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सपोनि सुदाम भागवत, उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, रामेश्वर शिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, लक्ष्मण चौधरी, विकास जाधव, बनकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 

अधिक माहिती घेतली असता पोलिसांना पॅन व एटीएम कार्डच्या आधारे तरुणीचे नाव छाया समाधान डुकरे असून ती जांब ता.जि बुलढाणा येथील रहिवासी असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी सोमवारी रात्रीच जांब येथे जात तरुणीच्या घरी चौकशी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तरुणीचे वडील समाधान डुकरे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी छायाच्या खुनाची कबुली दिली. तसेच या खुनात सहभागी नातेवाईकांची माहिती दिली. यावरून पोलिसांनी छायाचा मावसा महादू उगले ( रा. रुईखेड मायबा ता जि बुलडाणा ), आण्णा (गणेश) लोखडे (रा. सोनगिरी ) व रामधन दळवी (रा. येवता ता. जाफराबाद जि. जालना) यांना ताब्यात घेतले. 

या कारणामुळे केली हत्या  छाया ही पुण्यात शिक्षण घेत होती.यासोबतच ती खाजगी नोकरीसुद्धा करायची. याच दरम्यान तिचे शुभम वराडे ( भुसावळ) याच्या सोबत प्रेम संबंध होते. यातून ती गर्भवती राहिली. दिवाळीनिमित्त सुट्यात छाया घरी आली असता तिने आईवडिलांना याची माहिती दिली. यानंतर छायाच्या वडिलांनी तिला सोबत घेत महादू उगले, आण्णा (गणेश) लोखडे व रामधन दळवी या नातेवाईकांसोबत शुभमच गाव गाठले. मात्र येथे आले असता त्याचा फोन बंद होता. खूप प्रयत्न केल्यानंतरही त्याचा संपर्क न झाल्याने ते परत निघाले. मात्र, यामुळे समाजात आपली बदनामी होईल या कारणाने छायाच्या वडिलांनी सोबतच्या नातेवाईकांच्या मदतीने मेहेगाव शिवारात तिचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह धावडा-मेहेगाव रोडवर टाकून ते घराकडे परतले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकJalanaजालनाpregnant womanगर्भवती महिलाCrime Newsगुन्हेगारी