लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील सरपंचांवर अविश्वास ठराव आल्यामुळे पदभार उपसरपंचांकडे आला आहे. तो पदभार काढून त्या जागी प्रशासक नेमावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.गत तीन-चार महिन्यापासून मासिक बैठक झालेली नाही. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी समिती लागते. या समितीस ग्रामसभा महत्त्वाची असते. मात्र, संबंधितांनी अन्य कारणे दाखवून लोकांच्या सह्या घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच अॅरो फिल्टरला कनेक्शन देण्यात आलेले नाही, मागासवर्गीय वस्तीत पाण्याची गैरसोय आहे. सरपंचांचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असून, निकाल लागेपर्यंत प्रशासक नेमावा, या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात दत्ताराव सदावर्ते, श्रीकांत मस्के, रमेश राठोड, विजेंद्र मस्के, सुनील जाधव, अर्जुन मस्के, अंकुश राठोड, आनंदा सदावर्ते, मोहन सदावर्ते, मोहन मस्के व इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दहिफळ खंदारे ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:19 IST