अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:24+5:302021-02-19T04:20:24+5:30
जामवाडी येथील रस्त्याचे काम गतीने जालना : तालुक्यातील जामवाडी शिवारातील विहिरीत दोन कार पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. या ...

अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी उपोषण
जामवाडी येथील रस्त्याचे काम गतीने
जालना : तालुक्यातील जामवाडी शिवारातील विहिरीत दोन कार पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर येथे सुरू असलेल्या रस्त्याचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. शिवाय धोकादायक ठरणाऱ्या विहिरीजवळ बॅरेकेटींग करण्यात आले आहे. हे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दारू सहज उपलब्ध होत असल्याने युवा पिढी व्यसनाधीन झाली असून, महिला, मुली तळीरामांमुळे त्रस्त झाल्या आहेत. तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.