कपाशीच्या तुलनेत सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:05+5:302021-06-11T04:21:05+5:30
याउलट सोयाबीनला येणारा खर्च हा कपाशीच्या तुलनेने कमी असून, चांगले भाव मिळत आहेत. गेल्यावर्षी सोयाबीनचे भाव थेट साडेसात ...

कपाशीच्या तुलनेत सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल
याउलट सोयाबीनला येणारा खर्च हा कपाशीच्या तुलनेने कमी असून, चांगले भाव मिळत आहेत. गेल्यावर्षी सोयाबीनचे भाव थेट साडेसात हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे यंदाही सोयाबीनला अशीच मागणी राहणार असून, सध्या सोयाबीनपासून निघणाऱ्या खाद्यतेलाला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या तेलाचे उत्पादन घेणाऱ्या ऑईल मिल चालकांकडून सोयाबीनला मोठी मागणी आहे. बाजारात सध्या मूग, मकासह तुरीला मोठी मागणी आहे. कमी पाण्याचा पुरवठा असणाऱ्या शेतकऱ्यांकडून मका तसेच सोयाबीनला पसंती शेतकरी देत आहेत. यामुळे घरातील सोयाबीनचे बियाणे वापरावेत म्हणून जवळपास ४० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग केला आहे. परंतु, उर्वरित शेतकऱ्यांना हे बियाणे मिळताना अनेक अडचणी येत आहेत.
चौकट
महाबीजकडूनही अत्यल्प पुरवठा
महाबीजच्या सोयाबीन बियाणांना मोठी मागणी आहे. गेल्यावर्षी जवळपास दहा हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होते. ते यंदा केवळ तीन हजार क्विंटल उपलब्ध आहेत. त्यामुळे ते बाजारातून केव्हाच संपले आहे. विशेष म्हणजे महाबीजची ३० किलोची बॅग ही २२५० रुपयांना मिळत असून, बाजारातील खासगी कंपन्यांच्या किमती या तीन हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. यंदा महाबीजने अधिक पुरवठा केला असता तर बराच लाभ शेतकऱ्यांना झाला असता, असे सांगण्यात आले.
बियाणांचे १३० नमुने घेतले
जालना जिल्ह्यातील विविध बियाणांचे कृषी विभागाने जवळपास १३० नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील ४० अहवाल प्राप्त झाले असून, त्यात कुठल्याही त्रुटी नसल्याचे सांगण्यात आले.