शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ ठरली वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:22 IST

वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल

ठळक मुद्दे वर्षभरापूर्वी  २१ एप्रिल रोजी प्रायोगिक तत्त्वावर बाजारपेठ सुरु औरंगाबादेतही होणार केंद्र

- संजय देशमुख

जालना : पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि दरवर्षी होणारा अत्यल्प पाऊस यात कोणती पिके घ्यावीत हा शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर जालीम उपाय सापडला असून, अत्यंत कमी पाण्यावर फुलणारी रेशीम शेती अर्थात तुतीची लागवड त्यांच्यासाठी संजीवनी ठरली आहे. पूर्वी रेशीम कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत असे. आता जालन्यातच ही बाजारपेठ सुरू झाली आहे. जालन्यातील या बाजारपेठेत गेल्या वर्षभरात साडेतीन कोटींची  उलाढाल झाली आहे. 

कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. यासाठी जालन्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच सरकारच्या रेशीम विकास विभागाने भगीरथ प्रयत्न केले. त्याचे चांगले परिणाम आज दहा वर्षांनंतर दिसून येत आहेत.  महाराष्ट्रात रेशीम कोषाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत २२८० मेट्रीक टनांवरून थेट साडेतीन हजार मेट्रीक टनापर्यंत वाढले आहे. एकीकडे सर्व पिकांची उत्पादकता घसरत असतांना रेशीम शेती मात्र, शेतकऱ्यांना हक्काचा आर्थिक स्रोत निर्माण करून देत आहे. 

जालन्यात बाजार समितीने वर्षभरापूर्वी  २१ एप्रिल रोजी प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ सुरू केली.  या वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे.  जालन्यात कायमस्वरूपी रेशीमकोष खरेदीसाठी ६ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.

औरंगाबादेतही होणार केंद्रजालन्याप्रमाणेच औरंगाबादेतही २५ एकर जागेत अंडीपुंज निर्मिती केंद्र स्थापनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी २७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आचारसंहिता संपताच त्याला मंजूरी मिळेल, अशी माहिती  रेशीम उपसंचालक दिलीप हाके यांनी दिली. 

धागा निर्मिती केंद्रही सुरू रेशीम कोषापासून धागा निर्मिती केंद्रही जालन्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. म्हणजेच कच्चा माल उत्पादन केल्यावर तो खरेदी करण्यासाठी जालन्यात हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजारJalanaजालनाdroughtदुष्काळ