पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:15+5:302021-02-05T07:59:15+5:30
मंठा : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याकडे वरिष्ठ ...

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण
मंठा : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने पीक कर्ज मंजूर करावेत, या मागणीसाठी बँकेसमोर पांगरी बु. येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.
पांगरी बु. येथील शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडे पीक कर्जाचे प्रस्ताव सादर केले होते. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात होती. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले असून, तातडीने पीक कर्ज मंजूर करावे, अशी मागणी केली जात आहे. या निवेदनावर अनिल खिल्लारे, विजय खरात, मधुकर बोबडे, आसाराम साबळे, गणेश घुगे, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष आसाराम साबळे, तालुकाध्यक्ष गणेश घुगे, कांताबाई खरात, तान्हाबाई खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.