जाफराबाद तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:33+5:302021-01-13T05:21:33+5:30
खरेदी केलेल्या मक्याची रक्कम देण्याची मागणी जाफराबाद : शासकीय भरड धान्य केंद्राअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम अद्याप मिळाली ...

जाफराबाद तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण
खरेदी केलेल्या मक्याची रक्कम देण्याची मागणी
जाफराबाद : शासकीय भरड धान्य केंद्राअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाच्यावतीने सहा महिन्यांपूर्वीच मका खरेदी करण्यात आली होती. शेवटच्या तीन ते चार दिवसांत खरेदी केलेल्या ८४ शेतकऱ्यांच्या २९४० क्विंटल मक्याचे ५१ लाख ७५ हजार रुपये अद्यापही मिळाले नाहीत. या सर्व शेतकऱ्यांच्या मक्याचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करावेत, अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एकनाथ शेवत्रे, राजू बोराडे, शंकर सोळंकी, आत्माराम बकाल, भगवान चव्हाण, प्रभाकर गावंडे, सुभाष दळवी, सुभाष लोखंडे, दिलीप काळे, नामदेव काळे, अनिल काळे, विनोद बोरसे, प्रमिला डोळस, शेख खाजू शेख युसूफ, परसराम ढाळे, सखाराम गावंदे, विक्रम फदाट, शे. रियाज शे. गणी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पंडित, नितीन शिवणकर, सुभाष भोपळे, ज्ञानदेव शेवत्रे, गजानन सूळ, पांडुरंग चव्हाण, विनोद खेडेकर, वामन चव्हाण, बाळू इंगळे, अर्जुन कोरडे, संजय इंगळे, शोभाबाई दाभाडे, पंडित डुकरे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून तब्बल सहा महिने उलटले आहेत. अद्यापही त्याचा मोबदला मिळालेला नाही. सुमारे सहा महिन्यानंतर मका परत घेऊन जाण्याचे पत्र शासनाने व संघाने दिल्याने एवढ्या दिवसानंतर मका परत घेऊन कसे जायचे..? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. फोटो
जाफराबाद तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण
खरेदी केलेल्या मक्याची रक्कम देण्याची मागणी
जाफराबाद : शासकीय भरड धान्य केंद्राअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकºयांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जाफराबाद तालुक्यातील शेतकºयांची शासनाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच मका खरेदी करण्यात आली होती. शेवटच्या तीन ते चार दिवसांत खरेदी केलेल्या ८४ शेतकºयांच्या २९४० क्विंटल मक्याचे ५१ लाख ७५ हजार रुपये अद्यापही मिळाले नाही. या सर्व शेतकºयांच्या मक्याचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करावे, अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी शेतकºयांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एकनाथ शेवत्रे, राजू बोराडे, शंकर सोळंकी, आत्माराम बकाल, भगवान चव्हाण, प्रभाकर गावंडे, सुभाष दळवी, सुभाष लोखंडे, दिलीप काळे, नामदेव काळे, अनिल काळे, विनोद बोरसे, प्रमिला डोळस, शेख खाजू शेख युसुफ, परसराम ढाळे, सखाराम गावंदे, विक्रम फदाट, शे.रियाज शे.गणी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पंडीत, नितीन शिवणकर, सुभाष भोपळे, ज्ञानदेव शेवत्रे, गजानन सुळ, पांडुरंग चव्हाण, विनोद खेडेकर, वामन चव्हाण, बाळू इंगळे, अर्जुन कोरडे, संजय इंगळे, शोभाबाई दाभाडे, पंडित डुकरे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.
दिरंगाई करणाºया अधिकाºयांवर कारवाई करा
शेतकºयांची मका खरेदी करुन तब्बल सहा महिने उलटले आहे. अद्यापही मकाचा मोबदला मिळालेला नाही. सुमारे सहा महिन्यानंतर मका वापस घेवून जाण्याचे पत्र शासनाने व संघाने दिल्याने एवढ्या दिवसानंतर मका वापस घेवून कशी जायची..? असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे. दिरंगाई करणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी देखील शेतकºयांनी केली आहे.