शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST2021-01-15T04:26:06+5:302021-01-15T04:26:06+5:30

जाफराबाद : शासकीय भरड धान्य केंद्राअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, ...

The farmers' fast continues for the third day | शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

जाफराबाद : शासकीय भरड धान्य केंद्राअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

शेतकऱ्यांची देयके अदा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपोषणास बसलेले काही शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले आहेत. जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच मका खरेदी करण्यात आली होती. शेवटच्या तीन ते चार दिवसांत खरेदी केलेल्या ८४ शेतकऱ्यांच्या २९४० क्विंटल मक्याचे ५१ लाख ७५ हजार रुपये अद्यापही मिळाले नाही. या सर्व शेतकऱ्यांच्या मक्याचे पैसे तत्काळ खात्यावर जमा करावे, अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी एकनाथ शेवत्रे, राजू बोराडे, शंकर सोळंकी, आत्माराम बकाल, भगवान चव्हाण, प्रभाकर गावंडे, सुभाष दळवी, सुभाष लोखंडे, दिलीप काळे, नामदेव काळे, अनिल काळे, विनोद बोरसे, प्रमिला डोळस, शेख खाजू शेख युसुफ, परसराम ढाळे, सखाराम गावंदे, विक्रम फदाट, शे. रियाज शे. गणी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पंडित, नितीन शिवणकर, सुभाष भोपळे, ज्ञानदेव शेवत्रे, गजानन सुळ, पांडुरंग चव्हाण, विनोद खेडेकर, वामन चव्हाण, बाळू इंगळे, अर्जुन कोरडे, संजय इंगळे, शोभाबाई दाभाडे, पंडित डुकरे, आदींची उपस्थिती होती.

.....तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार

जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या उपोषणास तहसीलदार सतीष सोनी, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, नायब तहसीलदार केशव डकले, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश चव्हाण, नगराध्यक्ष दीपक वाकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी, युवानेते दीपक बोह्राडे, युवानेते राजेश म्हस्के, अ‍ॅड. रामेश्वर अंभोरे, अ‍ॅड. विष्णू शिंदे, अ‍ॅड. वरुण देशपांडे, शिवसेनेचे कुंडलिक मुठ्ठे, गजानन शेवत्रे, भगतसिंग लोदवाल, सिद्धार्थ पैठणे, दत्ता भालके, किरण मोरे, आदींनी भेटी दिल्या.

Web Title: The farmers' fast continues for the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.