फरदड कापसाची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:29+5:302021-02-19T04:20:29+5:30
जानकर यांनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद घनसावंगी : माजी पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मच्छिंद्रनाथ चिंचोलीवाडी येथे भेट देवून पदाधिकारी, ...

फरदड कापसाची आवक
जानकर यांनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद
घनसावंगी : माजी पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मच्छिंद्रनाथ चिंचोलीवाडी येथे भेट देवून पदाधिकारी, सदस्यांशी संवाद साधला. पक्षसंघटन वाढविणे, आगामी निवडणुका आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गजानन वायसे, वैजीनाथ वायसे यांच्यासह परिसरातील रासपचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
आलमगाव शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
अंबड : तालुक्यातील आलमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच द्रौपदाबाई खरात, उपसरपंच शिवाजी गोंटे, बाबासाहेब खरात, मधुकर आरगडे, विठ्ठल भिसे, हरिश्चंद्र शेळके, राम शेळके, मदनराव खाडे, शिवनाथ बारगे, किरण बरकसे, बाबासाहेब शिंदे, शिवाजीराव शेळके, संदीप डोईफोडे, मुख्याध्यापक विष्णू आढाव आदींची उपस्थिती होती.
कुंभार पिंपळगावात अभिवादन कार्यक्रम
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लहुजी शक्तीसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित लोंढे, तालुकाध्यक्ष जयिसंग लोंढे, जालिंदर लोंढे, पिंटू कांबळे, दीपक लोंढे, नारायण कांबळे, ताराचंद रोकडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.