सुखापुरी शाळेत ७५ मुलांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:55+5:302021-02-25T04:37:55+5:30
काणे यांचा सत्कार जालना : राज्य क्रिकेट संघटनेच्या निवड समितीवर येथील राजू काणे यांची निवड करण्यात आली आहे. या ...

सुखापुरी शाळेत ७५ मुलांची नेत्र तपासणी
काणे यांचा सत्कार
जालना : राज्य क्रिकेट संघटनेच्या निवड समितीवर येथील राजू काणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जालना येथे काणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन कापसे, क्रीडा मार्गदर्शक सतीश कापसे, जावेद खान यांच्यासह शहर व परिसरातील खेळाडूंची उपस्थिती होती.
सुपिकता निर्देशांकाचा शेतकऱ्यांना फायदा
जालना : जमिनीत रासायनिक घटकांचा वाढता वापर व अपधावांच्या वाढत्या प्रमाणामुळे एक इंच सुपिक थर पाण्याबरोबर अन्नद्रव्यांसह वाहून जात आहे. त्यामुळे जमिनीचा निर्देशांक कमी होत आहे. शेतकऱ्यांना गावच्या शिवारातील जमिनीत उपलब्ध सुक्ष्म अन्नद्रव्ये व इतर घटकांची माहिती व्हावी, यासाठी सुपिकता निर्देशांक ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन
जालना : तालुक्यातील वाघ्रूळ येथील राजकुंवर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्राार्य राजेंद्र जायभाये, प्रकाश टाकला, प्रा. मापारी, प्रा. अमित राजपूत, प्रा. डॉ. जाधव, प्रा. जोगदंड, प्रा. वाहुळ, सरोदे, शिवराम गिते, संदीप गायके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.