वडीगोद्री येथे २७३ जणांची नेत्र तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:09+5:302020-12-22T04:29:09+5:30

वडीगोद्री : आरोग्यमंत्री राजेश टोपे व एच.व्ही.देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महानवदृष्टी अभियानांतर्गत अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रविवारी ...

Eye examination of 273 persons at Vadigodri | वडीगोद्री येथे २७३ जणांची नेत्र तपासणी

वडीगोद्री येथे २७३ जणांची नेत्र तपासणी

वडीगोद्री : आरोग्यमंत्री राजेश टोपे व एच.व्ही.देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महानवदृष्टी अभियानांतर्गत अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रविवारी मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २७३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०० व्यक्तींचे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निदान झाले. त्यांच्यावर पुणे येथील एच.व्ही.देसाई हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

याप्रसंगी एच.व्ही.देसाई हॉस्पिटलचे डॉ. रणजित कदम, डॉ. अजित यादव, अंबड पंचायत समितीचे सभापती बापूराव खटके, उपसरपंच अशोक मांगदरे, अ‍ॅड. सचिन पवार, आनंद पवार, नारायण वायाळ, पंढरीनाथ खटके, बाबासाहेब बोंबले, दीपक पवार, अभिजित पवार, उमेश काळे, प्रशांत लिपणे आदींची उपस्थिती होती. शिबिर यशस्वीतेसाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ए.डी. बडे, डॉ. एस.ए. भांगे, डॉ. उगले, डॉ. एस.के. सानप, आरोग्यसेवक बिबे, सी.के. वाहूळ, योगेश बळी, हर्षद शेख, कैलास वराडे, टी.सी. आहिरे, यु.ए. साने, सी.के. वाहुल, एच.एस. शेख, एम.एल. ढाकणे, गटप्रवर्तक उज्ज्वला दखणे, आशा सेविका स्वाती कोळपकर, चेतना बिबे, सविता गिरी, वर्षा आगलावे, दया खेडकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Eye examination of 273 persons at Vadigodri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.