आवेदनपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:53+5:302021-01-13T05:20:53+5:30

जालना : दहावी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ...

Extension of time for submission of applications | आवेदनपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

आवेदनपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

जालना : दहावी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आवेदनपत्र ऑननलाइन पद्धतीने भरण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर प्रगटनाद्वारे दहावी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ऑनलाइन आवेदनपत्र भरताना इंटरनेटसंदर्भात अडचणी येत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिलेली नाही. शिवाय बहुतांश शिक्षक हे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर आहेत. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे शिक्षक, कर्मचारी निवडणूक कार्यात व्यस्त आहेत. परिणामी सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र पूर्णत: ऑनलाइन झाले नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. बारावी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाइन भरण्यास मुदतवाढ दिली आहे. याच अनुषंगाने इयत्ता दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठीदेखील मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केली होती. या निवेदनाची दखल बोर्डाने घेऊन दहावीचे आवेदनपत्र भरण्यास २५ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी दिली आहे.

इंटरनेटच्या अडचणी व ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात शिक्षक गुंतल्यामुळे ५० टक्केच आवेदनपत्र भरली गेली होती. प्रहार संघटनेने पाठपुरावा करून आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी पुढाकार घेतला होता.

मुकुंद खरात, तालुकाध्यक्ष, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जालना

Web Title: Extension of time for submission of applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.