मूर्ती येथील शेतमजुराच्या खुनाचा उलगडा; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:21 IST2019-03-23T00:21:16+5:302019-03-23T00:21:47+5:30
र्ती येथील शेतमजूर आसाराम बालकिसन सोळंके (वय ५०) यांचा १५ मार्चला मूर्ती परिसरात मृतदेह आढळला होता. ते १३ मार्चला घरातून शेतात जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी दोन कोयते सापडल्याने हा खून असावा, हे जवळपास निश्चित होते.

मूर्ती येथील शेतमजुराच्या खुनाचा उलगडा; एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी/ कुंभार पिंपळगाव़ : तालुक्यातील मूर्ती येथील शेतमजूर आसाराम बालकिसन सोळंके (वय ५०) यांचा १५ मार्चला मूर्ती परिसरात मृतदेह आढळला होता. ते १३ मार्चला घरातून शेतात जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी दोन कोयते सापडल्याने हा खून असावा, हे जवळपास निश्चित होते.
तीन दिवस उलटल्यावरही आसाराम सोळंके हे घरी आले नव्हते. त्यातच १५ मार्च रोजी मूर्ती शिवारामध्ये एका निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद गोंदी पोलिसांनी घेतली होती. या खुनानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दरम्यान, त्याचा कसून शोध घेतला असता यामध्ये मूर्ती येथीलच तरूण माऊली वामनराव सोळंके याच्यावर संशय बळावला त्याला ताब्यात घेऊन त्याने प्रथमदर्शनी खून केल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा खून आपण आई व बहिणीवर मयत आसाराम सोळंके याने भानामती केल्यामुळे केल्याचे सांगितले. एका साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. अद्याप त्या साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व इतर पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.