भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:19+5:302021-09-07T04:36:19+5:30
शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या पदाधिकारी तसेच अन्य कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला. त्यात सिध्दिविनायक मुळे तसेच ...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या पदाधिकारी तसेच अन्य कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला. त्यात सिध्दिविनायक मुळे तसेच सुनील खरे, मयुर ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन चर्चा केली. तसेच शहरातील एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. आगामी पालिका निवडणुकीत एकूण जवळपास ५५ जागांवर भाजपला स्वत:चे उमेदवार द्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांची आतापासून तयारी आणि चाचपणी केली जात आहे.
संध्या देठे यांच्या पुस्तिकेचे विमोचन
भाजपच्या नगरसेविका संध्या संजय देठे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांच्या पुस्तिकेचे म्हणजेच कार्य पूर्तता अहवालाचे विमोचन केले. त्यावेळी त्यांनी प्रत्येक भाजप नगरसेवकाने असा कार्य पूर्तता अहवाल काढून तो जनतेसमोर मांडावा तसेच शहरातील नागरी समस्या आणि भाजपने केलेला विकास जनतेत जाऊन सांगण्याचे आवाहन केले. देठे यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे पाटील यांनी जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केले.