व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:39+5:302020-12-23T04:26:39+5:30
फोटो भोकरदन : तालुका व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात तालुकाध्यक्षपदी महादूसिंग राजपूत डोभाळ यांची बिनविरोध निवड ...

व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर
फोटो
भोकरदन : तालुका व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात तालुकाध्यक्षपदी महादूसिंग राजपूत डोभाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहरातील गुणनंदी भवनमध्ये रविवारी व्यापारी महासंघाची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, सचिव प्रवीण मोहता, सहसचिव जगन्नाथ थोटे, धनराज जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी महादूसिंग राजपूत, उपाध्यक्षपदी विजय जैन, सचिवपदी योगेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक राहुल ठाकूर यांनी केले.
व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषदमध्ये आपला एक प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. शिक्षक पदवीधरचा मतदार संघ असू शकतो तर व्यापाऱ्यांचा का नाही ? याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गटनेते संतोष अन्नदाते, कैलास बाकलीवाल, जितेंद्र बाकलीवाल, विशाल लोहाडे, मयूर बाकलीवाल, विरेंद्र काला, गणेश पडोळ, दिलीप पांडे, विनय पालकर, अनिल गिरणारे, बापू देशमुख, संजय जैन आदींची उपस्थिती होती.