पाण्याचा अतिरिक्त दाब; जलवाहिनी पुन्हा निखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:16 AM2020-01-29T00:16:14+5:302020-01-29T00:17:04+5:30

जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली.

Excess water pressure; The drainage receded | पाण्याचा अतिरिक्त दाब; जलवाहिनी पुन्हा निखळली

पाण्याचा अतिरिक्त दाब; जलवाहिनी पुन्हा निखळली

Next
ठळक मुद्दे१० दिवसांपासून निर्जळी : आता जुन्या जालन्याला टँकरने पाणी

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली. याचा परिणाम जुन्या जालन्यातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. १० दिवसांपासून जुना जालन्यात पाणी न आल्याने नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. यावर उपाय म्हणून आता पालिका प्रशासनाने नवीन जालन्यातील जलशुध्दीकरण केंद्रातून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुना जालना भागाला पैठण येथील जायकवाडी योजनेतून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. तर सध्या नवीन जालना विभागाला घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरविले जात आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी पाचोड जवळ रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असतांना पोकलनेचा धक्का लागून निखळली होती. पालिकेने शर्थीचे प्रयत्न करून ती जलवाहिनी दुरूस्त केली. परंतु, दुरूस्तीनंतरही पाण्याचा अतिरिक्त दाब ही जलवाहिनी सहन करू न शकल्याने ती निखळली. यापूर्वी दोनवेळेस त्यावर सिमेंटचे अस्तरिकरण केले. परंतु, याचाही उपयोग झाला नाही.
सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पैठण येथील जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, चिंचखेड परिसरातील जलकुंभात हे पाणी पोहचल्यावर त्याच्या परतीचा दाब दुरूस्त केलेल्या जलवाहिनीवर आल्याने ती जलवाहिनी पुन्हा निखळून त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. ही निखळलेली जलवाहिनी नव्याने दुरूस्तीचे काम मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आले. परंतु, ते आणखी दोन दिवस सुरू राहणार असल्याने जुना जालन्यातील पाणीपुरवठा पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

Web Title: Excess water pressure; The drainage receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.