विद्यार्थ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:33+5:302021-02-26T04:43:33+5:30

कोठावळे यांचा सत्कार अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयातील प्रा. चंद्रसेन कोठावळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान ...

Examination of students | विद्यार्थ्यांची तपासणी

विद्यार्थ्यांची तपासणी

कोठावळे यांचा सत्कार

अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयातील प्रा. चंद्रसेन कोठावळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचा पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अभिवादन कार्यक्रम

परतूर : येथील योगानंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास भारत डाके, दिगांबर लिपणे, संतोष सोळंके, सूर्यकांत बुरांडे आदींची उपस्थिती होती.

व्याख्यानमाला स्थगित

जालना : शहरात दोन दिवसीय संत गुरू रविदास महाराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगिती देण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

हरडे यांचा सत्कार

जालना : शहरातील जेईएस महाविद्यालयातील प्रा. सतीश हरडे यांना पीएच.डी. पदवी मिळाली आहे. याबद्दल प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Examination of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.