विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:23+5:302020-12-27T04:22:23+5:30
पशुधन चिकित्सा शिबिर अंबड : तालुक्यातील लोणार भायगाव येथे पशुधन चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सिद्दिकी, डॉ. दत्तात्रय ...

विद्यार्थ्यांची तपासणी
पशुधन चिकित्सा शिबिर
अंबड : तालुक्यातील लोणार भायगाव येथे पशुधन चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सिद्दिकी, डॉ. दत्तात्रय सोळुंके यांनी पशुधनाच्या आजाराबाबत शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच रामप्रसाद दसपुते, सीताराम काळे, कल्याण खडके, सुभाष टकले, नारायण टकले, विष्णू खाडे, गणपत घुनगाव, वीर, बनसोडे, नाथा काळे, ओम गाडेकर यांच्यासह लोणार भायगाव व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
पादचाऱ्यांची गैरसोय
परतूर: शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठेत वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे पादचारी नागरिकांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. शिवाय शासकीय कार्यालयांच्या परिसरातही अशीच स्थिती वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.