शिबिरात १११ विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST2021-02-27T04:41:10+5:302021-02-27T04:41:10+5:30
जयंतीनिमित्त अभिवादन जालना : शहरात संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक ...

शिबिरात १११ विद्यार्थ्यांची तपासणी
जयंतीनिमित्त अभिवादन
जालना : शहरात संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक विष्णू पाचफुले, परीट समाजाचे कोषाध्यक्ष संतोष चौधरी, नारायण कुमठे, रामकिसन कायंदे, कैलास यशवंते आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन
जालना : तहसील कार्यालयात वादग्रस्त जमिनीचे अपील देताना गैरप्रकार झाला आहे. यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर सुरेश डावखरे, अण्णासाहेब चितेकर, पंडित रगडे, सुदास बनसोडे आदींची उपस्थित होती.
शहागड येथे विश्वकर्मा जयंती साजरी
शहागड : शहागड येथे प्रभू विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष धर्मराज हरेर, अनिल हरेर, अशोक जगताप, अजय चौधरी, महादेव शिंदे, प्रकाश शेंबडे, माऊली खरात, अशोक कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
पिंपरखेड गावात स्वच्छता मोहीम
कुंभार पिंपळगाव: घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामस्थांनी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत गावातील भगवती माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. यावेळी अनिल सानप, गणेश सिरसाट, बापू घाडगे, लखन रक्ताटे, उद्धव देवकाते, बाळू अनुसे, याेगेश थाेरात, किसन रक्ताटे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षपदी डॉ. राजेश जोगदंड
अंबड: धाकलगाव येथील डॉ. राजेश लक्ष्मण जोगदंड यांची बीएचएमएस डॉक्टर महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय पवार, सचिव अशोक भोजने यांनी केली आहे. या नियुक्तीबद्दल डॉ. श्रीनिवास चित्रे, डॉ. देवानंद भाले, चांदखा पठाण, अभिषेक गिल्डा, जावेद देशमुख आदींनी कौतुक केले.
रोषणगाव येथे विद्यार्थ्यांची तपासणी
बदनापूर : जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बदनापूर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय मार्फतही विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील रोषणगाव येथील शिवाजी विद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांची आरपीटीसीआर तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्याअंतर्गत तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांची कोरोना आरपीटीसीआर तपासणी करण्यात येत आहे.
निराधारांचे मानधन देण्याची मागणी
जालना: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ या योजनातील लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसून, लाभार्थ्यांना थकीत मानधन तत्काळ देऊन प्रतिमहिना पाच हजार रुपये देण्याची मागणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले आहे.