ऐतिहासिक राममंदिराच्या कामासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे - अंभोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:20+5:302020-12-22T04:29:20+5:30
जाफराबाद येथे बैठक : जाफराबाद : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिराच्या कामात सर्वांचा सहभाग असावा म्हणून देशपातळीवर निधी संकलित ...

ऐतिहासिक राममंदिराच्या कामासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे - अंभोरे
जाफराबाद येथे बैठक :
जाफराबाद : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिराच्या कामात सर्वांचा सहभाग असावा म्हणून देशपातळीवर निधी संकलित करण्यात येत आहे. या धार्मिक कार्यात सर्वांचे योगदान महत्वाचे असून, गावागावात जनजागृती करुन ऐतिहासिक राममंदिराच्या कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन हातभार लावावा, असे प्रतिपादन तालुका अभियानप्रमुख अॅड. रामेश्वर अंभोरे यांनी जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथील गौरीशंकर महादेव मंदिर येथे आयोजित बैठकीत केले. यावेळी विष्णू पवार, गजानन सातव, हभप ज्ञानेश्वर माउली, सुरेश महाराज देव्हडे, खोत, अभियान प्रमुख ॲड. रामेश्वर अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अंभोरे म्हणाले की, तालुक्यातील १०२ गावात मंडलची स्थापना करुन स्वयंसेवकांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. राममंदिराचे काम हे व्यापक स्वरुपाचे असल्याने निधी संकलनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी संभाजीनगर येथील कार्यकारी सदस्य हनुमंत जाधव म्हणाले की, देशातील ६ लाख गावांपैकी ५ लाख गावांतून श्रीराम मंदिराच्या कामासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. सर्व समाजाच्या मदतीशिवाय देशात कोणतेही काम आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे मंदिराच्या कामासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन जाधव यांनी केले. यावेळी सुरेश दिवटे, संतोष लोखंडे, शालीकराम म्हस्के, गोविंद पंडित, राजेश चव्हाण, भाऊसाहेब जाधव, दत्तू पंडित, मधुकर गाढे, साहेबराव कानडजे, दादाराव सवडे, ॲड. रामेश्वर अंभोरे, दगडूबा गोरे, एकनाथ घाटगे, मोहन मुळे, अनिल बोडे, कडुबा शितोळे, जगन पंडित, निवृत्ती दिवटे, साहेबराव मोरे, मधुकर देठे, डॉ. निलेश चव्हाण, श्रीकृष्ण चेके, साहेबराव भुतेकर, नाना पंडित, राजू साळवे, राजू चिडे, संदीप खंडेलवाल, मंगेश गव्हाड, संजय खंडेलवाल, विजय परीहार, उध्दव दुनगहू, विजय शेवत्रे, अनिल चौतमल, प्रदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.