रक्तदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -आकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:18+5:302020-12-22T04:29:18+5:30
परतूर येथील शास्त्री महाविद्यालयात रक्तदान शिबिर परतूर : राज्यात कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही गरज ...

रक्तदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -आकात
परतूर येथील शास्त्री महाविद्यालयात रक्तदान शिबिर
परतूर : राज्यात कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे, असे मत मराठवाडा सूर्यादय प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कुणाल यांनी व्यक्त केले.
परतूर येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल आकात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय राखे, प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे, उपप्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, डॉ. रवी प्रधान, उपप्राचार्य संभाजी तिडके, डॉ. भागवत नाईकनवरे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना कुणाल आकात म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यातच कोरोनामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजनही करता आले नाही. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येऊन रक्ताचा तुटवडा दूर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरात प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. तापडीया, प्रा. श्यामसुंदर अबूज, डॉ. राम वायाळ, डॉ. अशोक पाठक यांच्यासह २५ जणांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. राजेश सुसर, डॉ. अनिल कुलकर्णी, प्रा. राम खालापुरे, प्रा. वैशाली चौधरी यांची उपस्थिती होती.
फोटो.
परतूर येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष कुणाल आकात, विजय राखे, प्राचार्य सदाशिव मुळे, उपप्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, रवी प्रधान, संभाजी तिडके आदी.